प्रस्तावना
व्यवसाय शिक्षण:-ज्या शिक्षणामूळे उमेदवारात रोजगाराची क्षमता निर्माण होते, असे शिक्षण म्हणजे व्यवसाय शिक्षण.
मंडळाचे कायक्षेत्र :- महाराष्ट्र राज्य
1)उद्देश:-
1).औद्योगिकीकरणातील वाढ, बदलतेतंत्रज्ञान, सामाजिक व आर्थिक बदल या बाबींचा विचार करता अर्धवट शिक्षण सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच विशिष्ट शिक्षणघेणा-या विद्यार्थ्यांसाठी (ऍ़ड-ऑन कोर्सेस) कमी कालावधीचे व्यावसायिक अभ्यासक्रम तयार करुन अशा विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगारास चालना मिळणेचे दृष्टीने आवश्यक असणा-या व्यवसाय शिक्षणाची गरज भागविण्यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखाली सन 1986 मध्ये महाराष्ट्रराज्य व्यवसाय शिक्षण परीक्षामंडळाची स्थापना करणेत आली.
2).राज्यातील विविध भागातील खेडयापाडयातील गोरगरीब विद्यार्थी संस्थांमध्ये प्रवेश घेऊन प्रशिक्षण पूर्ण करीत असतात. आणि प्रशिक्षण पूर्ण झालेले विद्यार्थी मंडळामार्फत घेण्यातयेणा-या परीक्षेसाठी बसतात. जे विद्यार्थी परीक्षेस उत्तीर्ण होतात त्यांना शासनाचेवतीने मंडळामार्फत प्रमाणपत्र देण्यात येत असते. मंडळाचे अभ्यासक्रम हे रोजगार व स्वयंरोजगारास चालना देणेचे दृष्टीने विशेष करुन शाळा अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरतात.
3).शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळांतर्गत शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून विविध गटातील शैक्षणिक अर्हतेनुसार, तसेच 6 महिने कालावधीचे एकुण 152, 1 वर्ष कालावधीचे एकुण 96 आणि 2 वर्ष कालावधीचे एकुण 44 अर्धवेळ व पूर्णवेळ असे एकुण मिळुन 292 अभ्यासक्रम राबविण्यात येतात.
2)कार्य:--
1) मंडळाचे अभ्यासक्रम तयार करणे व अभ्यासक्रमाची पाठयपुस्तके ठरविणे
2) मंडळाने ठरविलेले अभ्यासक्रम शिकविण्यासाठी इच्छूक शैक्षणिक संस्थांना मान्यता देणे.
3) मंडळाच्या मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांच्या शिक्षकांची किमान शैक्षणिक अर्हता ठरविणे.
4) मंडळाच्या मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांची परीक्षा घेणे
5)परीक्षेचा निकाल जाहीर करुन, मार्कशिटस् व प्रमाणपत्र वाटप करणे.
|